Twitter | Search | |
Dhananjay Munde
Opposition Leader | Maharashtra Legislative Council | |
6,149
Tweets
75
Following
194,797
Followers
Tweets
Dhananjay Munde 12h
Replying to @dhananjay_munde
स्वर्गीय अण्णांनी, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आपली संपूर्ण हयात लोकांसाठी खर्च केली. वैद्यनाथ कारखाना नावारूपाला आणला. शेतकऱ्यांचं कल्याण केलं. आज त्याच कारखान्याची काय अवस्था केली आहे? शेतकऱ्यांचे पैसे थकवलेय. आमच्या बजरंग बप्पाने लोकसभेत हरल्यानंतरही शेतकऱ्यांना १२ कोटी दिले.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
Replying to @dhananjay_munde
छत्रपती शिवाज महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साक्षीनं शब्द देतो की जर मला आमदार म्हणून निवडून दिले तर परळीचा चेहेरा-मोहरा बदलून टाकेन. या लेकाला आशीर्वाद द्या. या मतदारसंघाची ताकद एवढी वाढवू की आपल्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात पान हालणार नाही.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
Replying to @AjitPawarSpeaks
आज २४ वर्षांपासून तुमची अविरत सेवा करतोय. सर्वांच्या सुखा-दुखात सहभागी झालो. कधीच हात आखडता घेतला नाही. सत्तेत नसतानांही प्रामाणिकपणे या मातीची सेवा केली. परळीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं हेच माझं स्वप्न आहे. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ते मी पूर्ण करणारच.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
Replying to @NCPspeaks
कर्जमाफी, अनुदान, अंगणवाडी सेविकांचे, पोलिस पाटील, संगणक चालक या सर्वांच्या प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवला. पिकविमा तर घेतल्याशिवाय आंदोलनातून उठलोच नाही. मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटते की बीड जिल्हातील नेमकी आमचे दोन तालुकेच पिकविम्यातून का वगळले?
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
Replying to @PawarSpeaks
सत्तेत नसतानाही आदरणीय साहेब आपल्यासाठी झिजतायत. एका हाकेत या परळीकरांसाठी सिमेंटची कंपनी आणली, ८० मेगावॅटचा प्रकल्प, ५०० कोटींची गुंतवणुक आणली. या मातीचं मी देण लागतो. आपल्या माणसाशी इमान राखातोय. तुमच्या उत्कर्षासाठीच पवार साहेबांचा आदर्श ठेवत कार्य करतोय.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
Replying to @dhananjay_munde
परळीत उद्योगास चालना मिळावी यासाठी MIDC उभारण्याची धडपड करतोय. उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय. शिरसाळ्याची गायरान जमिनसुद्धा या प्रोजेक्टसाठी वापरावी हे सुचवले. आमच्या पालकमंत्री मात्र सत्ता असून, उद्योगपतींशी ओळख असून माझ्या भावांसाठी रोजगार निर्माण करू शकत नाही हे दुर्दैव.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
Replying to @NCPspeaks
परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले. आणि माझ्या मातीची आज दशा झाली. जायकवाडीचे पाणी वाण धरणात यावे ही स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांची इच्छा होती. त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून दिल्लीत सत्ता दिली मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 12h
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे माझ्या परळीकरांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. खरंतर आजही दुष्काळात होरपळत असताना हा उत्सव साजरा कसा करावा हा प्रश्न मनात असतानाही,परळीकरांनी जे प्रेम दिलं, ज्या उत्साहाने स्वागत केलं त्याने मी भारावून गेलो. त्यांचे आभार मानतो.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 13h
मुख्यमंत्री साहेब, ही पहा गर्दी... परळी वैजनाथ मतदारसंघातील जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेस मिळालेला आशीर्वाद...
Reply Retweet Like
Dhananjay Munde 16h
मुख्यमंत्री महोदय म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही... साहेब, खास तुमच्यासाठी हा फोटो... उघडा डोळे, बघा नीट!
Reply Retweet Like
Dhananjay Munde 16h
Replying to @dhananjay_munde
गंगाखेड साखर कारखान्यात ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. गंगाखेडच्या लोकांना या साखर कारखान्याच्या मालकाने दिवसाढळ्या लुटले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपेने साखर कारखान्याच्या मालकावर एफआयआर सुद्धा दाखल झाली नाही. भ्रष्ट लोकांना यांचाच आशीर्वाद आहे.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 16h
या सरकारच्या विरोधात कोणी आवाज केला तर 'ईडी' लिंबू फिरवले जाते. यांनी अमित शाह, मोदींचा पर्दाफाश केला त्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली. राज ठाकरे आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडायचे. ईडी तेव्हाही अस्तित्वात होते पण आघाडी सरकारने कधीच नीच राजकारण केले नाही.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 19h
Replying to @NCPspeaks
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रॅलीवर एका शेतकऱ्याने कर्जमाफी संदर्भातील पत्रके भिरकवत ही कर्जमाफी आहे का? असा सवाल करत निषेध नोंदवला. या घटनेतच मुख्यमंत्र्यांच्या सरसकट, तत्वत:, निकषासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिलेल्या फसव्या कर्जमाफीचा पर्दाफाश झाला.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 19h
राज्यात एकीकडे पूराने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आपल्या मराठवाड्यात आजही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अशी भीषण परिस्थिती असताना महोदय मात्र त्यांच्या महाजनादेश यात्रेत खोट्या जलयुक्त शिवाराचे बॅनर नाचवतायत.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 19h
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्पाच्या पाथरी येथील भव्य सभेले संबोधित केले. आदरणीय साहेबांनी पुरोगामी विचारांनी वटवृक्षाप्रमाणे वाढवलेल्या या पक्षासाठी स्वत:चे प्राण पणाला लावणारे आपण कार्यकर्ते आहोत. आपण सुराज्य स्थापन करायचेच.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 19h
राज्यात एकीकडे पूराने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आपल्या मराठवाड्यात आजही टँकर पाणी पुरवठा सुरू आहे. अशी भीषण परिस्थिती असताना मुख्यमंत्री मात्र त्याच्या महाजनादेश यात्रेत खोट्या जलयुक्त शिवाराचे बॅनर नाचवतायत.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 19h
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्पाच्या पाथरी येथील भव्य सभेले संबोधित केले. आदरणीय साहेबांनी पुरोगामी विचारांनी वटवृक्षाप्रमाणे वाढवलेल्या या पक्षासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणारे आपण कार्यकर्ते आहोत. आपण सुराज्य स्थापन करायचेच.
Reply Retweet Like
Dhananjay Munde 21h
शिवस्वराज्य यात्रेदरम्यान पाथरी परिसरातील एकवीस एकरमध्ये पसरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आदरणीय अजितदादा पवार, खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह केले. तसेच प्रांगणात उभारलेल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
Reply Retweet Like
Dhananjay Munde Aug 22
Replying to @PawarSpeaks
आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग बदलत आहे. अशा परिस्थितीत विजय भांबळे यांनी छातीठोकपणे सांगितले की मी शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांची साथ सोडणार नाही. एकही पत्रकार याची हेडलाईन करणार नाही. पत्रकार फक्त कोणाच्या गळाला कोण लागणार याच बातम्या देणार.
Reply Retweet Like
Dhananjay Munde Aug 22
Replying to @dhananjay_munde
सरकारने एका देवासाठी एक याप्रमाणे ३३ कोटी झाडं यावर्षी व गेल्यावर्षी मिळून ३८ कोटी झाडं लावली. झाडांना पाणी यांनी खणलेल्या शेततळ्यातून, विहरीतून, जलशिवारातून गेलं का? तुम्हाला ही बहरलेली झाडं दिसली का? बहुधा... जलशिवार योजना, ही झाडं फक्त यांच्याच पुण्यवान कार्यकर्त्यांना दिसतात.
Reply Retweet Like