Twitter | Search | |
Sharad Pawar
President of Nationalist Congress Party
3,680
Tweets
13
Following
1,961,702
Followers
Tweets
Sharad Pawar 17h
How to wash your hands? साबण किंवा हँडवॉशने हात कसे धुवावेत? साबुन या हैंडवाश से हाथ किस तरह से धोए?
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आज व्हिडीओ काँन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा दिला.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
कांदा निर्यातबंदीनंतर काल बांगलादेशानेही नापसंती नोंदवली आहे. केंद्र सरकारच्या मनात येईल तेव्हा त्यासंबंधी सरकार निर्णय घेऊ शकतं, हे धोकादायक आहे. त्यामुळे कायद्यातल्या तरतुदी दाखवा, हा आमचा आग्रह त्यामागे होता. तो याठिकाणी पाळला गेला नाही.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
कांद्याचे भाव वाढले म्हणून महागाई झाली, असे केंद्राचे म्हणणे आहे. पण रोजच्या दैनंदिन जेवणामध्ये कांद्याच्या खर्चाचं योगदान किती? ते क्षुल्लक आहे. असं असताना कांद्यामुळे महागाई आहे असं सांगून लगेच परदेशातले कंत्राट रद्दबातल करून थांबवायचे, हे योग्य नाही.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
केंद्र सरकार सवलत दिली म्हणत असेल तर त्यांनी हमीभावाबद्दल बोलावे, पण त्यासंबंधीचं स्पष्टीकरण त्यावेळी दिलं गेलं नाही, सदनामध्ये चर्चा करू दिली नाही. एका बाजूला मार्केट खुलं केलं असं म्हणता व दुसऱ्या बाजूला नाशिकच्या कांद्यावर निर्यातबंदी का घातली गेली? याचे उत्तरही मिळाले नाही.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
ही खरेदी प्रामुख्याने फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने किमान हमीभाव जाहीर करून केली जाते. कृषीमंत्री म्हणून दहा वर्षे काम पाहिल्याने मला त्याची थोडीफार माहिती आहे. त्यामुळे ही कोट्यवधींची खरेदी करण्याचं काम जे कृषी बाजार समितीतून होतं, त्याबद्द्ल बोला असे सदस्यांचे म्हणणे होते.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
ही कृषि विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची काही आवश्यकता नव्हती. एका विधेयकाद्वारे कॉर्पोरेट सेक्टरला एखाद्या राज्यात जाऊन पिकाची पूर्ण खरेदी करण्याचा अधिकार मिळाला. कृषि बाजार समितीमध्ये काही मालाची खरेदी ही विशेषतः पंजाब, हरियाणा आणि पश्चिम युपीमधून केली जाते.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
लोकसभेमध्ये खा. सुप्रिया सुळेही या विषयावर बोलल्या आहेत. माझे पक्षातील इतर सहकारी सदनात उपस्थित होते. मात्र मते मांडू देण्याची भूमिकाच घेतली जात नाही, हे दिसल्यानंतर त्याबद्दलची तीव्र भावना व्यक्त झाली. कारण दुसरा काही पर्याय नव्हता.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
कृषिविषयक विधेयके मंजूर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी वॉकआऊट केला अशा अर्धवट माहितीवर काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रफुल पटेल राज्यसभेमध्ये स्पष्टपणाने भूमिका मांडली.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
या सदस्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी मीही आज पूर्ण दिवसभर अन्नत्याग करणार आहे. अर्थात माझ्यासह संसदेतील इतर सहकारी सदस्यांनी ही भूमिका घेतली तरी उपाध्यक्षांच्या वर्तनात काही परिवर्तन येईल असं म्हणणं हे धाडसी ठरेल.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
या सदस्यांचा भूमिका मांडण्याचा अधिकार पूर्णपणाने धुडकावून लावूनही उपोषण सुरू असताना उपाध्यक्षांकडून त्यांच्यासाठी चहापान पाठवण्यात आले. सदस्यांनी ते नाकारले, परंतु कर्पूरी ठाकूर यांच्या विचाराने चालणाऱ्या नेत्यांसंबंधी आमचे मूल्यांकन चुकले, हे यानिमित्ताने कबूल करायला हवे.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
हा सगळा घटनाक्रम घडत असताना काही सदस्यांनी मतं व प्रतिक्रिया तीव्रपणे व्यक्त केली. त्यावर लगेच कारवाई करून काही सदस्यांचे अधिकार हिरावून घेतले. ते सदस्य प्रतिक्रिया म्हणून संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश करण्यासाठी काल संध्याकाळपासून उपोषण व धरणं धरून बसले आहेत.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
मला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की, बिहारमधील कर्पुरी ठाकूर या अत्यंत ज्येष्ठ तसेच संसदीय व लोकशाही पद्धतीचे जाणकार असलेल्या नेत्यांच्या विचाराने माननीय उपाध्यक्ष चालतात असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने त्या सगळ्या विचाराला तिलांजली देण्याचे काम राज्यसभेत त्यांच्याकडून झालं आहे.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात व देशाच्या संसदेत सतत ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. परंतु पीठासीन व्यक्तींकडून याप्रकारचे वर्तन मी कधी पाहिलेले नाही.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
मतदानदेखील आवाजी पद्धतीने घेऊन ही विधेयके मंजूर केली गेली. साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता होती. सदस्यांना त्यांची मते मांडण्याची संधी देणं आवश्यक होतं. पण हे संसदीय संकेत पाळले गेले नाहीत.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
नियमांचे पुस्तक पुन्हा पुन्हा दाखवूनही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याने ते नियमांचं पुस्तक फाडण्याचा प्रकार घडला. कमीत कमी खासदार कोणता नियम सांगत आहेत हे ऐकून घ्यावे,अशी अपेक्षा माननीय उपाध्यक्षांकडून होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून तातडीने मतदान घेण्याची भूमिका घेतली गेली.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे सदनातील काही सदस्य नियमांच्या पुस्तकाचा आधार घेऊन, त्या नियमांचा उल्लेख करून माननीय उपाध्यक्षांना सांगत होते. असे असतानाही सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
या कृषि विधेयकांसंदर्भात राज्यसभेतील सदस्यांना काही प्रश्न, शंका आणि मतं व्यक्त करायची होती आणि त्यासंबंधीचा आग्रह त्यांनी धरलेला होता. हा आग्रह बाजूस ठेवून सदनाचं काम पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न असावा असं प्रथमदर्शनी त्याठिकाणी दिसून येत होतं.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
राज्यसभेत कृषिविषयक दोन-तीन विधेयके सादर होणार होती. त्यावर तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा होती. मी टीव्हीवर सभागृहाचे संपूर्ण कामकाज पाहात होतो. ही विधेयके तातडीने मंजुर करून घ्यावीत या प्रकारचा सत्ताधारी पक्षाचा आग्रह असल्याचे त्यात निदर्शनास आले.
Reply Retweet Like
Sharad Pawar Sep 22
Replying to @CMOMaharashtra
राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले आहे. हे अपील लवकरात लवकर करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुण पिढीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी अस्वस्थता आहे. या कामासाठी मला राज्यात थांबावं लागल्यामुळे राज्यसभेत हजर राहता आले नाही.
Reply Retweet Like